Advertisement

एलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक

एलपीजी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधारला एलपीजी कनेक्शनशी जोडणे आवश्यक आहे. आधारला एलपीजी कनेक्शनशी जोडण्याचे अनेक मार्ग आहेत.

एलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक
SHARES

सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेंतर्गत प्रत्येक सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम थेट ग्राहक बँकेच्या खात्यात (bank account)  जमा केली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आधारला (aadhar) एलपीजी कनेक्शनसह (LPG connection) जोडायचे असेल तर ते शक्य आहे. कारण एलपीजी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधारला एलपीजी कनेक्शनशी जोडणे आवश्यक आहे. आधारला एलपीजी कनेक्शनशी जोडण्याचे अनेक मार्ग आहेत. वेबसाइट, वितरक, आयव्हीआरएसद्वारे किंवा एसएमएस पाठवून आधारला एलपीजीशी जोडता येईल. 

असं करं ऑनलाइन लिंक (online link)

- Rasf.uidai.gov.in/seeding/User/ResidentSelfSeedingpds.aspx या वेबसाइटला भेट द्या व आवश्यक माहिती भरा.

- एलपीजी अंतर्गत 'बेनिफिट प्रकार' निवडा आणि त्यानंतर एलपीजी कनेक्शननुसार योजनेचे नाव सांगा, जसे भारत गॅस कनेक्शनसाठी 'बीपीसीएल' आणि इंडेन गॅस कनेक्शनसाठी 'आयओसीएल'.

- ड्रॉप-डाउन सूचीमधून 'वितरक' निवडा आणि एलपीजी ग्राहक क्रमांक भरा.

- मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि आधार क्रमांक भरा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

- नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर ओटीपी प्राप्त होईल. पुढे प्रक्रिया करण्यासाठी ओटीपी भरा.

- नोंदणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तपशिलाची पडताळणी केली जाईल आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर तसेच ईमेल आयडीवर अधिसूचना पाठविली जाईल.

एसएमएसः एलपीजी सेवा प्रदात्यास एसएमएस पाठवून एलपीजीशी आधार जोडला जाऊ शकतो. एलपीजी वितरकाकडे मोबाइल नंबर नोंदवा आणि नंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवा. हेही वाचा -

प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू, मिळतील 'हे' फायदे

फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा