Advertisement

प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू, मिळतील 'हे' फायदे

या वेबसाईटवर आयटीआर फाइलिंग करण्यासह आयकर परतावा मिळण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. तसंच अन्य सर्व महत्त्वाची कामं करता येणार आहेत.

प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू, मिळतील 'हे' फायदे
SHARES

प्राप्तिकर विभागाने आपले नवीन ई-फाइलिंग पोर्टल सोमवारी सुरू केले. नवीन ई-फाईलिंग पोर्टलचा उद्देश करदात्यांना सुलभता आणि  आधुनिक, वेगवान सेवेचा  अनुभव प्रदान करणे हा आहे. मागील एक आठवडा संकेतस्थळ अद्ययावत करण्याचं काम सुरु होतं. त्यानंतर आता ७ जून रोजी नवीन ई-फाईलिंग पोर्टल कार्यान्वित करण्यात झालं आहे.

प्राप्तिकर विभागाची www.incometax.gov.in ही नवीन वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आयटीआर फाइलिंग करण्यासह आयकर परतावा मिळण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. तसंच अन्य सर्व महत्त्वाची कामं करता येणार आहेत.

करदात्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन कर भरणा प्रणाली १८ जून रोजी म्हणजेच आगाऊ कर हप्ता भरण्याच्या तारखेनंतर सुरू केली जाईल. नवे मोबाईल अॅपदेखील लॉंच करण्यात येणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामकाजाची सुविधा मोबाईलवरदेखील उपलब्ध होणार आहे.

नवीन ई-फाइलिंग पोर्टलची वैशिष्ट्ये

१) आयटीआरची तात्काळ प्रक्रिया 

नव्या ई -फायलिंग पोर्टलमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे आयटीआर फायलिंगची प्रक्रिया तात्काळ स्वरुपात होणार आहे. याचा फायदा होत करदात्यांना इन्कम टॅक्स रिफंडदेखील जलदरित्या मिळणार आहेत.

२) नवा डॅशबोर्ड

करदात्यानी अपलोड केलेली सर्व कागदपत्रे, अपूर्ण राहिलेली कामे एकाच डॅश बोर्डवर दिसतील. तसेच सर्व प्रकारचे परस्परसंवाद  आणि अपलोड्स हे एकाच डॅशबोर्डवर करता येणार आहे. त्यामुळे करदात्यांची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

३) ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा 

नवीन पोर्टलवर आयटीआर १, ४ (ऑनलाईन आणि ऑफलाईन) आणि आयटीआर २ (ऑफलाईन) संदर्भात करदात्यांच्या मदतीसाठी सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. आयटीआर ३, ५, ६, ७ तयार करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

ज्या करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचे कोणतेही ज्ञान नाही असे करदातेदेखील या नव्या ई-फायलिंग पोर्टलचा वापर करून प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतील. हे नवे सॉफ्टवेअर अत्यंत कमी डेटा एन्ट्रीद्वारे आयटीआर भरण्याची सुविधा ग्राहकांना देते.

४) नवीन कॉल सेंटर 

करदात्याच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी नवीन कॉल सेंटर सुरू केलं जाणार आहे. करदात्यांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न, नियमावली, व्हिडीओ या सुविधा उपलब्ध असणार आहेत. याशिवाय इतर काही समस्या असल्यास चॅटबॉट आणि लाईव्ह प्राप्तिकर विभागच्या एजंटशी बोलण्याची सुविधा देखील मिळेल.

 ५) प्रोफाईल अपडेट

पगार, घर,मालमत्ता आणि अन्य व्यवसायासह उत्पन्नाचा तपशील भरताना करदात्याला आपले प्रोफाईल अपडेट करता येणार आहे. त्याचा उपयोग नंतर आयटीआर दाखल करण्यासाठी केला जाईल.

६)  प्री-फिलिंग

एसएफटी आणि टीडीएसची माहिती अपलोड झाल्यानंतर पगाराचे उत्पन्न, व्याज आणि भांडवली नफ्यासह प्री-फिलिंगची सुविधा उपलब्ध असेल.हेही वाचा - 

फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम

नेटफ्लिक्स मुंबईत उभारणार जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा