Advertisement

नेटफ्लिक्स मुंबईत उभारणार जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ

नेटफ्लिक्सनं त्यांचा जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ मुंबईत उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नेटफ्लिक्स मुंबईत उभारणार जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ
SHARES

डिजिटल मनोरंजन जगात एक नंबरवर असलेली ओटीटी कंपनी नेटफ्लिक्सनं त्यांचा जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ मुंबईत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रथमच भारतात गेल्या दोन वर्षात विविध भाषातील कंटेंट तयार करणं आणि खरेदी करण्यासाठी ३ हजार कोटींची गुंतवणूक केल्याचं मान्य केलं आहे.

मुंबईत कंपनी त्यांचा पहिलाच लाईव्ह अॅक्शन फुल सर्व्हिस पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ उभारत आहे. हा स्टुडीओ पुढील वर्षी जून पर्यंत कार्यान्वित होणार आहे. यामुळे भारतीय कथा जागतिक पातळीवर पोहोचवण्यास मदत होईल.

नेटफ्लिक्स जगात ओटीटी मधील आघाडीची कंपनी आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांचे मासिक तसंच वार्षिक दर अधिक असूनही कंपनीनं पहिले स्थान कायम राखलं आहे. प्रीमियम ओटीटी कंटेंट मध्ये कंपनी सर्वात पुढे आहे.

भारतात या कंपनीनं त्यांच्या कामाची सुरवात ५ वर्षापूर्वीच केली आहे, पण आजपर्यंत त्यांनी ग्राहक संख्या किंवा गुंतवणूक याविषयी कोणतीही माहिती जाहीर केलेली नव्हती असं समजतंय.

यंदा प्रथमच कंपनीनं अशी आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीनं कंटेंट साठी केलेल्या ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीत ४१ वेब सिरीज आणि फिल्म्स समाविष्ट आहेत.



हेही वाचा

Covid-19 ने मृत्यू झाल्यास ५ वर्ष कुटुंबीयांना मिळणार पगार, रिलायन्सची मोठी घोषणा

मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क २ टक्के करा, क्रेडाय-एमसीएचआयची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा