Advertisement

फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम

कोरोना काळात पैशांची गरज भासल्यावर अनेक जण पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेत आहेत. मात्र, या कर्जावर प्राप्तिकरात सूट मिळते याची अनेकांना माहिती नाही.

फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम
SHARES

कोरोना काळात पैशांची गरज भासल्यावर अनेक जण पर्सनल लोन (personal loan - वैयक्तिक कर्ज)  घेत आहेत. मात्र, या कर्जावर प्राप्तिकरात (income tax) सूट मिळते याची अनेकांना माहिती नाही. ही माहिती असेल तर आपण ही सूट घेऊन कर वाचवू शकतो. 

जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट हेतूसाठी वैयक्तिक कर्ज (personal loan) वापरता तेव्हा आपण कर्जासाठी दिलेल्या व्याजावर (interest)  कर लाभ घेऊ शकता. आपण घराचे नूतनीकरण किंवा खरेदी आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी वैयक्तिक कर्ज वापरल्यास आपण कर्जावरील व्याजावर प्राप्तिकर सूट (income tax exemption) घेऊ शकता.

प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४ बी नुसार जर आपण घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत असाल तर आपण कर्जावर भरलेल्या व्याजावर २ लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतो.  कलम २४ बी गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जामध्ये फरक करत नाही आणि व्याजावर जास्तीत जास्त २ लाख रुपयांची कपात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते.

व्यवसायासाठी कर्ज घेतल्यानंतरही कर सूट मिळते. जर वैयक्तिक कर्जाचा वापर व्यवसायासाठी केला असेल तर आपल्याला कर्जाच्या व्याजावर कर सवलत मिळते. याशिवाय आपण वैयक्तिक कर्जाचा वापर दागदागिने खरेदी केल्यास किंवा समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास आपण यावरही कर सूट मिळवू शकता. मात्र, ज्या वर्षी आपण देतो त्या वर्षी ही सूट घेतली जाऊ शकत नाही. जेव्हा आपण ती मालमत्ता विक्री करता त्या वर्षात कराचा लाभ मिळे.

वैयक्तिक कर्जावरील करात सवलत मिळविण्यासाठी आपल्याला खर्चाचे व्हाउचर, बँक प्रमाणपत्र, कर्ज मंजुरी पत्र व लेखा परीक्षकांचे पत्र आदी कागदपत्रे द्यावी लागतील. कर्जाची रक्कम ही उत्पन्नाची रक्कम मानली जात नाही. म्हणून वैयक्तिक कर्जावर कर आकारला जात नाही.हेही वाचा - 

नेटफ्लिक्स मुंबईत उभारणार जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ


  1. आरबीआयकडून व्याजदर कायम, पण विकासदराचा अंदाज घटवला
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा