Advertisement

आरबीआयकडून व्याजदर कायम, पण विकासदराचा अंदाज घटवला

रिझर्व्ह बँकेने (reserve bank of india) आपल्या पतधोरणात व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. रेपो दर (repo rate) ४ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.

आरबीआयकडून व्याजदर कायम, पण विकासदराचा अंदाज घटवला
SHARES

रिझर्व्ह बँकेने (reserve bank of india) आपल्या पतधोरणात व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. रेपो दर (repo rate) ४ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआय (RBI) ने व्याजदर स्थिर ठेवल्याने बँकांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरातही (interest rates)  बदल होणार नाही. 

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या तीन दिवसांच्या बैठकीनंतर द्विमासिक पतधोरणाची (monetary policy) घोषणा केली गेली.  रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये कुठलाही बदल केल्या नसल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. सलग सहाव्यांदा आरबीआयने रेपो दर (repo rate) कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रिझर्व्ह रेपो रेट (reverse repo rate) आणि कर्ज दरसुद्धा ३.५ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. 

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातही कोरोनाचा (coronavirus) अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असं सांगत जीडीपीचा अंदाज घटवला आहे. चालू वर्षात विकास दर ९.५ टक्के राहील, असे बँकेनं म्हटलं आहे. चालू वर्षात महागाई दर ५. १ टक्के राहील, असं आरबीआयने म्हटलं आहे.  चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर ५.२ टक्के तर दुसऱ्या तिमाहीत ५.४ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के आणि चौथ्या तिमाहीत महागाई ५.३ टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने वर्तवला आहे.

शक्तिकांत दास यांनी सांगितले, की अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी आरबीआय  १७ जून रोजी ४० हजार कोटी रुपयांचे सरकारी कर्ज रोखे खरेदी करणार आहे. नंतर दुसऱ्या तिमाहीत १.२० लाख कोटी रुपयांचे सरकारी कर्ज रोखे खरेदी केले जातील. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नुकसान झालेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी विशेष कर्ज योजना सुरू करणार आहे. यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत १५ हजार कोटी रुपयांचं कर्ज दिलं जाईल. यामध्ये ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, एडव्हेंचर-हेरिटेजशी संबंधित सेवा देणाऱ्या, एव्हिएशन सेक्टरशी संबंधित ग्राउंड हँडलिंग आणि पुरवठा कंपन्यांचा समावेश असेल, असं दास यांनी सांगितलं. हेही वाचा - 

Covid-19 ने मृत्यू झाल्यास ५ वर्ष कुटुंबीयांना मिळणार पगार, रिलायन्सची मोठी घोषणा

मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क २ टक्के करा, क्रेडाय-एमसीएचआयची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा