विजय माल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी

भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपये थकवून लंडनमध्ये पळालेल्या उद्योगपती विजय माल्याला (६२) अाता भारताच्या ताब्यात देण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे.  माल्याच्या प्रत्यार्पणास लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली अाहे. वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या या निर्णयाचे सीबीआयने स्वागत केले आहे.

आव्हान देता येणार

 प्रत्यार्पणाच्या सुनावणीवेळी न्यायाधीश एम्मा आर्बुटनॉट यांनी म्हटलं की, प्रथमदर्शनी माल्याच्या विरोधात फसवणूक, कट रचणे अाणि मनी लॉन्डरिंगचा गुन्हा सिद्ध होत अाहे. न्यायालयाने माल्याच्या  प्रत्यार्पणास मंजुरी देत हे प्रकरण अाता ब्रिटनच्या गृह विभागाकडे पाठवलं अाहे. गृह विभाग त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. तर १४ दिवसात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्यायही माल्ल्याकडे असणार आहे.

माझा प्रस्ताव स्वीकारावा

निकालाच्या अाधी न्यायालयात अालेल्या माल्याने म्हटलं होतं की, मी कर्ज परतफेड करण्याचा प्रस्ताव दिला होता. माझ्या या अाॅफरचा प्रत्यार्पणाशी काहीच संबंध नाही. मी पैसे चोरले नाहीत. किंगफिशर एअरलाइन्सला वाचवण्यासाठी मी ४ हजार कोटी रुपये यामध्ये लावले होते.  कर्जाची मुद्दल परत करण्याचा दिलेला माझा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंतीही त्याने केली. 


हेही वाचा - 

अारबीअायचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा


 

पुढील बातमी
इतर बातम्या