विजय माल्याला हायकोर्टाकडून दिलासा नाही; ईडीविरोधात याचिका फेटाळली


SHARE

बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवून परदेशात पळालेल्या उद्योगपती विजय माल्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून कसलाही दिलासा मिळालेला नाही. अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) विजय माल्याला फरार अारोपी घोषीत करून कारवाई सुरू केली अाहे. ही कारवाई थांबवावी अशी मागणी करणारी याचिका माल्याने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका अाता उच्च न्यायालयाने फेटाळली अाहे. 


प्रत्यार्पणासाठी प्रयत्न

विजय माल्यावर देशातील बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज अाहे. मात्र, या कर्जाची परतफेड न केल्याने माल्यावर फसवणूक अाणि मनी लॉन्ड्रिंगचा अारोप ठेवण्यात अाला अाहे. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यावर माल्या इंग्लंडला पळून गेला. मार्च २०१६ पासून माल्या लंडनमध्येच राहत अाहे. भारत सरकार इंग्लंडकडे त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत अाहे. 


जाणूनबुजून कर्ज बु़डवले

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीने पहिल्याच अर्जात म्हटलं होतं की, सुरूवातीपासून कर्जाची परतफेड न करण्याकडे माल्याचा कल होता. कर्जाची परतफेड करण्यासाठी माल्या अाणि त्याच्या युनाइटेड ब्रेवरीज होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीकडे पुरेशी संपत्ती होती. मात्र, माल्याने जाणूनबुजून कर्ज बु़डवले. हेही वाचा - 

Exclusive: मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच, मुंबईकर सायबर पोलिस ठाण्याच्या प्रतीक्षेत!

भेसळखोरांना आता जन्मठेपेची शिक्षा
संबंधित विषय
ताज्या बातम्या