आता व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसेही पाठवता येणार

आता व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने व्हॉट्सअ‍ॅपला यासाठी परवानगी दिली आहे. आहेत. WhatsApp UPI आधारित ही पेमेंट सेवा असून यापूर्वीच तिची चाचणीही झालेली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅप प्रायोगिक तत्वावर ही सुविधा देत आहे. मात्र त्याला एनपीसीआयची परवानगी नसल्यानं, ती आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आली नव्हती. संपूर्ण भारतात सध्या ४० कोटी जण व्हॉट्सऍप वापरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबत करारही केला आहे. यात आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि जिओ पेमेंट बँकेचा समावेश आहे.

विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवरून UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर पैसे पाठवता येणार आहेत. म्हणजे समोरची व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही आपण तिला पैसे पाठवू शकतो. भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर वापरकर्त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय असेल तरच त्याचा वापर करता येणार आहे. हा पर्याय नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय बघता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणे अनिवार्य आहे. हे डेबिट कार्ड UPI ला सर्पोट करणारे हवे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठविण्यासाठी वापरकर्त्याला व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट पर्यायावर जाऊन बँकेची निवड करायची आहे. त्यानंतर माहिती भरून सेवा सुरू करायची आहे.


हेही वाचा -

दिवाळीची सुट्टी झाली १४ दिवसांची, होणार लगेच लागू

अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं


पुढील बातमी
इतर बातम्या