Advertisement

विद्यार्थ्यांसाठी खूश खबर! दिवाळीची सुट्टी झाली १४ दिवसांची

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भावनांचा आदर करून ७ नोव्हेंबरपासून २० नोव्हेंबर २०२० पर्यंत १४ दिवसांची दिवाळीची सुट्टी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी खूश खबर! दिवाळीची सुट्टी झाली १४ दिवसांची
SHARES

विद्यार्थ्यांना अवघे ५ दिवस दिवाळीची सुट्टी जाहीर करणाऱ्या शालेय शिक्षण विभागावर चोहोबाजूंनी टीका झाल्यावर अखेर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भावनांचा आदर करून ७ नोव्हेंबरपासून २० नोव्हेंबर २०२० पर्यंत १४ दिवसांची दिवाळीची सुट्टी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी जाहीर केली आहे. या निर्णयाचं शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

याआधी शालेय शिक्षण विभागाने ५ नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर अशी केवळ ५ दिवसांचीच दिवाळी सुट्टी देण्यात आली होती. या कालावधीत शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं. त्यावर एवढी कमी सुट्टी देण्याऐवजी ती न दिलेलीच बरी अशी नाराजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केली होती. 

हेही वाचा- शाळांना दिवाळी सुट्टी फक्त ५ दिवस, विद्यार्थी-पालकांमध्ये नाराजी

शाळांना आधी २१ दिवस दिवाळीची सुट्टी देण्यात येत होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या ८० ऐवजी ७६ करण्यात आल्याने शाळांची दिवाळी सुट्टी १८ दिवस करण्यात आली. मात्र यावर्षी सुट्टी कापून ती थेट ५ दिवस इतकी कमी करण्यात आली. या तुलनेत केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहतील, असे निर्देश दिले आहेत. तर गुजरातमधील शाळांना २० दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत आॅनलाईनच्या माध्यमातून मुलं दररोज शिक्षण घेत असताना दिवाळीच्या काळात तरी त्यांना सणाचा आनंद घेण्यासोबत थोडाफार मानसिक आराम मिळावा म्हणून नियमानुसार १८ दिवस सुट्टी देण्याची मागणी होत होती.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊनमुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्ष शाळा सुरू न करता २२ जुलैपासून पूर्वप्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रौत्सव अशा सणांमध्येही विद्यार्थ्यांना आॅनलाईन अभ्यास करावा लागला. महाराष्ट्रात गणेशोत्सवात मोठी सुट्टी असते, ती देखील यंदा विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यामुळे दिवाळीची सुट्टी वाढवून मिळावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून देखील होत होती.

या मागणीचा विचार करत शालेय शिक्षण विभागाने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. त्यात ७ नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२० दरम्यान १४ दिवासांची सुट्टी देण्यात आली आहे.

(maharashtra education department extends school diwali vacation by 14 days)

हेही वाचा- ऑनलाईन शिक्षणातूनही मिळणार दिवाळीची सुट्टी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा