Advertisement

ऑनलाईन शिक्षणातूनही मिळणार दिवाळीची सुट्टी

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

ऑनलाईन शिक्षणातूनही मिळणार दिवाळीची सुट्टी
SHARES

कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धती महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. पण दिवाळी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणात दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

त्यावर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

१५ जूनपासून राज्यातील शिक्षण विभागानं शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू करून शिक्षण चालू ठेवलं आहे. त्यामुळे दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला असताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीनं मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे. त्या संबंधितांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रूची वाढावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा

ठाण्यातील दोन गावांनी विद्यार्थ्यांसाठी केली मोफत वायफायची सोय

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये- अमित देशमुख

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा