Advertisement

दिवाळीनंतर शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यभरातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा सरकारचा विचार (maharashtra government) असल्याचं वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

दिवाळीनंतर शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
SHARES

‘मिशन बिगीन अगेन’ (mission begin again) अंतर्गत महाराष्ट्र सरकार विविध सेवा सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करत असताना शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न सातत्याने विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. कोरोनामुळे लाखो-कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. हे अडथळे दूर सारून कधी एकदा पुन्हा शैक्षणिक वर्ग सुरळीतपणे सुरू होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (maharashtra education minister varsha gaikwad) यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus) वाढू नये म्हणून लाॅकडाऊन अंतर्गत मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षणाचं वर्ष १५ जूनला ऑनलाइन पद्धतीने सुरु झालं असलं, तरी प्रत्यक्ष शाळा सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांशी सामना करत अभ्यास करावा लागत आहे. (maharashtra education minister varsha gaikwad reacts on school opening)

हेही वाचा- बीकॉमच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

त्यावर, राज्यभरातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा सरकारचा विचार (maharashtra government) असल्याचं वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. 

इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असतात. त्यामुळे कोरोनासंदर्भातील सुरक्षेचे नियम पाळण्याच्या सूचनांची अंमलबजावणी करता येऊ शकते. शिवाय या इयत्तांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष महत्त्वाचं असल्याने या इयत्तांचे वर्ग सुरु करण्याबाबत आधी विचार होईल, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने ११ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, अशी अपेक्षाही यावेळी वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

Read this story in English
संबंधित विषय