Advertisement

बी.कॉमच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर


बी.कॉमच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठानं बीकॉमच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर केला आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत १ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या संख्येतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. शिवाय, 'मास मीडिया'च्या अंतिम वर्षाचाही निकाल जाहीर करण्यात आला.

बीकॉम सेशन ५ (सीबीसीएस), बीकॉम अकाउंट्स अँड फायनान्स सत्र ६ आणि बीकॉम बँकिंग व इन्शुरन्स सत्र ६ व सत्र ५, बीफार्म सत्र ७ व सत्र ८, बीए कलिनरी आर्ट्सच्या अंतिम वर्ष सत्र ५ व सत्र ६ (सीबीसीएस), बी-व्हीओसी टुरिसम व हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र ५, बी-व्हीओसी रिटेल मॅनेजमेंट सत्र ५, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या अंतिम वर्ष सत्र ५, टीवाय बी कॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटच्या अंतिम वर्ष सत्र ५, फायनान्शियल मॅनेजमेंटच्या अंतिम वर्ष सत्र ५, बी.एससी एव्हिएशन सत्र ५, टी.वाय. बीएमएनएम आणि इकोनॉमिक्स सत्र ५ सोशल वर्क सत्र ५, तृतीय वर्षाचे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर सत्र १ आणि सत्र २ या अभ्यासक्रमांचे निकाल मुंबई विद्यापीठानं जाहीर केले आहेत.

यंदा कोरोनाचं सावट राज्यावर असल्यानं सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतला होता. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळू नियंत्रणात येत असताना शैक्षणिक विभागानं परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement