मुंबईकरांनो... पाणी जपून वापरा, पालिकेकडून १० टक्के पाणीकपात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत येत्या सोमवारपासून ५ दिवसांसाठी १० टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरील न्यूमॅटिक झडपांच्या तातडीचं दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ पर्यंत पाणीकपात करण्याची घोषणा मुंबई महापालिकेनं केली आहे.

पुढच्या आठवड्यात ५ दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी कमी दाबानं आणि कमी कालावधीसाठी मिळण्याची शक्यता आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवार, दिनांक १७ मे २०२१ ते शुक्रवार, दिनांक २१ मे २०२१ या कालावधीत १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरावं तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावं, असे आवाहन करण्‍यात येत आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईत यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली नाही. परंतु आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं दुरुस्तीची कामं हाती घेतल्यानं पाणी कपात जाहीर करावी लागत आहे.

याआधी, मुंबईत फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसांसाठी पाणी कपात करण्यात आली होती. सायन, दादर, परेल, लालबाग, माटुंगा या भागात पाणीकपात करण्यात आली होती.


हेही वाचा

मुलांसाठी नवी मुंबईत ३०० खाटांचं विशेष काळजी केंद्र

म्युकोरमायकोसिसचा वाढता धोेका, हाफकिनला १ लाख इंजेक्शनची ऑर्डर

पुढील बातमी
इतर बातम्या