Advertisement

मुलांसाठी नवी मुंबईत ३०० खाटांचं विशेष काळजी केंद्र

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे पालकांमध्ये चिंता आहे. मात्र १ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना करोनाचा संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये धोका अत्यल्प राहणार असल्याचं बालरोगतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मुलांसाठी नवी मुंबईत ३०० खाटांचं विशेष काळजी केंद्र
SHARES

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेत मुलांना  जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने  नियोजन सुरू केलं आहे.  बेलापूर येथे लहान मुलांसाठी विशेष काळजी केंद्राची तयारी पालिका प्रशासनाने ठेवली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे पालकांमध्ये चिंता आहे. मात्र १ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना करोनाचा संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये धोका अत्यल्प राहणार असल्याचं बालरोगतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र, पालकांनी मुलांची काळजी घेत त्यांच्यात काही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता दक्ष राहण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई पालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसंच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईतील बालरोगतज्ज्ञ यांच्याशी वेबसंवाद साधत आगामी नियोजनच्या दृष्टीने चर्चा केली. यावेळी झालेल्या संवादामध्ये विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. त्यामध्ये तिस-या लाटेत लहान मुलांत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रसाराची शक्यता तितकीशी नाही, मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले. 

लहान मुलांपैकी काही मुले कोरोना पॉझिटिव्ह आली तरी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मुले ही कोणतीही लक्षणे नसलेली अथवा अत्यंत अल्प प्रमाणात लक्षणे असणारी असतील. मात्र काही मर्यादीत मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशा संख्येने ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स व पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणेविषयी सूचना करण्यात आल्या.

लहान मुलांसाठी गरजेच्या असलेल्या काही विशिष्ट चाचण्या उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विचारविनीमय करण्यात आला तसेच उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळापैकी काहीजणांना बालकांशी संबंधित वॉर्डमध्ये तसेच आयसीयू वॉर्डमध्ये काम करण्याविषयीचे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण आत्तापासूनच दिले जावे या बाबींवर चर्चा करण्यात आली.

नवी मुंबईत १ ते १७ वयोगटातील अंदाजे पाच लाखांच्या वर मुलांची संख्या असणार आहे. त्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळापैकी काही जणांना बालकांशी संबंधित विभागामध्ये तसेच अतिदक्षता विभागामध्ये काम करण्याविषयीचे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. लहान मुलांच्या विभागामध्ये मुलाचे आई किंवा वडील ‘केअर टेकर’ म्हणून थांबणं आवश्यक ठरतं. याचा विचारही सुविधा निर्माण करताना व्हाव्यात आशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्या आहेत. मार्गदर्शक नियमावलीही करण्यात येणार आहे.

पालिका कोणतीही जोखीम पत्करणार नसून मुलांसाठी स्वतंत्र ३०० खाटांची व्यवस्था बेलापूर विभागात करण्याची तयारी सुरू केली आहे. पालकांप्रमाणेच मुलांमध्येही मास्क वापरण्याचे संस्कार जपण्याची खबरदारी सर्व पालकांनी घ्यावी, असं आवाहन बांगर यांनी केलं आहे.



हेही वाचा - 

सहकारी बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही

देशात प्रवासासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा