Advertisement

गोरेगाव: दिंडोशीमध्ये मोठ्या ‘बेस्ट’ बसेस धावणार!

शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी यासाठी ‘बेस्ट’कडे पाठपुरावा केला.

गोरेगाव: दिंडोशीमध्ये मोठ्या ‘बेस्ट’ बसेस धावणार!
SHARES

दिंडोशीमध्ये आता ‘बेस्ट’च्या माध्यमातून मोठ्या बेस्ट बस चालवण्यात येणार आहेत. नागरी निवारा आणि मंत्री पार्क या मार्गावर धावणाऱ्या या गाड्यांमुळे शेकडो प्रवाशांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त 13 कन्व्हेशल गाड्या या मार्गावर धावतील.

सध्या गोरेगाव स्थानक ते नागरी निवारा 1 व 2 या 646 बस मार्गावर पाच गाड्या धावतात. तर 327 क्रमांकाच्या (गोरेगाव स्थानक ते शिवशाही प्रकल्प, मंत्री पार्क) चार गाड्या आणि 346 या मार्गावर चार गाड्या आरक्षित आहेत.

या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असून, मिडी गाड्या लहान असल्यामुळे प्रवाशांची रखडपट्टी होते. या पार्श्वभूमीवर सुनील प्रभू यांनी तत्कालीन बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर, श्रीनिवासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. यामुळे दाखल झालेल्या गाड्यांची पाहणी आज आमदार सुनील प्रभू यांनी केली.

यावेळी माजी उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर, माजी स्थापत्य समिती अध्यक्ष तुळशीराम शिंदे यांच्यासह बेस्ट प्रशासनाचे अधिकारी निनाद शिरोडकर, कनिष्ठ अभियंता अनिल यमगार उपस्थित होते.

गोरेगाव स्थानक डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा जोरदार ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी प्रभू यांनी दिला. तसेच डेपो परिसरातील पुरेसा प्रकाश नाही. त्यामुळे विजेचे बंद दिवे तत्काळ सुरू करणे. तसेच प्रवासी थांबे दुरुस्त करण्याच्या सूचना देखील आमदार प्रभू यांनी दिल्या.



हेही वाचा

कर्जत स्थानकावर 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान विशेष ब्लॉक

एकाच तिकिटावर 4 मेट्रो मार्गांवरून प्रवास करता येणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा