Advertisement

म्युकोरमायकोसिसचा वाढता धोेका, हाफकिनला १ लाख इंजेक्शनची ऑर्डर

ठाकरे सरकारनं मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या १ लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे.

म्युकोरमायकोसिसचा वाढता धोेका, हाफकिनला १ लाख इंजेक्शनची ऑर्डर
SHARES

कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस  (mucormycosis) आजाराचा राज्यभरात वेगानं फैलाव होत आहे. हा आजार दुर्मिळ असल्यानं राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारनं मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या १ लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली. म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून त्याबाबत तातडीनं उपाययोजना होणं गरजेचं आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत या आजारावर मोफत उपचार करता येतील का? याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्य सरकारनं रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सहा कंपन्यांना 3 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. हा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. याशिवाय, म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्यानं त्यासाठी हाफकिन संस्थेला एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर देण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, म्युकोरमायकोसिस (mucormycosis)चा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे. एका महिलेमध्ये ही लक्षणं आढळून आली असून तिचा डोळा निकामी झाला आहे.

महिलेला कोरोना झाला होता. त्या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यात महिलेचे डोळे वर आललेले दिसून आले. तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचं तपासणी दरम्यान लक्षात आलं.

तपासणी दरम्यान आढळलं की, महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. तर महिलेच्या सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणं आढळून आली. उजव्या डोळ्याच्या मासपेशींना सूज आली होती.

तसंच इतरही अंतर्गत लक्षणं वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आली. म्युकोरमायकोसिस या आजाराची सांगितली गेलेली लक्षणं या महिलेत आढळल्यानं या महिलेला म्युकोरमायकोसिस असल्याचं जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

म्युकोरमायकोसिस म्हणजेच ‘ब्लॅक फंगस’ यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. यात रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचं काही प्रकार समोर आले आहेत. म्युकोरमायकोसिस नावाचा बुरशीपासून होणारा दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग आहे. त्यातून डोळा गमविल्याची प्रकरणे मात्र नवीनच आहेत.



हेही वाचा

कोरोनाने निराधार झालेल्या बालकांना राज्य सरकार देणार आधार

लसीसाठी बीएमसी मागवणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदी करणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा