Advertisement

लसीसाठी बीएमसी मागवणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदी करणार

मुंबई पालिकेच्या गट नेत्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत लसीकरणाविषयी चर्चा झाली. यावेळी पालिकेकडून लस खरेदीविषयी जागतिक निविदा मागविण्याच्या निर्णयास गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने पाठिंबा देण्यात आला.

लसीसाठी बीएमसी मागवणार जागतिक निविदा, ५० लाख लस खरेदी करणार
SHARES

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र, मुंबईत लसींचा साठा मर्यादित असल्याने लसीकरण संथगतीने होत आहे. लसीअभावी काही लसीकरण केंद्रेही बंद करावी लागली आहेत. मुंबईकरांना पुरेश लस उपलब्ध होण्यासाठी आता महापालिकेने लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पालिकेच्या गट नेत्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत लसीकरणाविषयी चर्चा झाली. यावेळी पालिकेकडून लस खरेदीविषयी जागतिक निविदा मागविण्याच्या निर्णयास गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने पाठिंबा देण्यात आला. यानुसार आता पालिकेने पालिकेने स्वत: जागतिक निविदा काढून ५० लाख डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यावेळी दिली. येत्या दोन दिवसांतच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लशींचा मुबलक साठा उपलब्ध होणार असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.

 मुंबईत सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा होत  आहे. जागतिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणखी चार लसींची भर पडेल. त्यात फायजर, जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुटनिक, मॉडर्ना अशा चार कंपन्यांचा समावेश असेल. ५० लाखांहून अधिक डोस देणाऱ्या कंपनीकडून लस खरेदी केली जाणार आहे. हेही वाचा

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा