बीकेसीमध्ये अाढळला ११ फुटी अाजगर

बांद्रा कुर्ला संकुल (बीकेसी)  परिसरातील रस्त्यावर शनिवारी तब्बल ११ फुट लांबीचा अजगर आढळून आला. या भागातील पोलिसांना गस्त घालताना हा अजगर दिसून अाला. पोलिसांनी  तात्काळ सर्पमित्राला संपर्क करत याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्रांनी या ठिकाणी धाव घेत अजगराला पकडलं. 

९ महिन्यात २० अजगर 

बीकेसीमध्ये सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे आणि मेट्रो ३ च्या कामामुळे जमिनीला मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत. त्यामुळं अजगरांची घर नष्ट होत असून हे वन्यजीव शहरी वस्तीत येत आहेत. हा अजगर वनविभागाकडे देण्यात येणार आहे. मुंबईत मानवी वस्तीमध्ये वन्यजीवांचं शिरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गेल्या ९ महिन्यात बांद्रा कुर्ला संकुल परिसरात २० अजगर पकडल्याची माहिती सर्पमित्र अतूल कांबळे यांनी दिली आहे.


हेही वाचा -

बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आरेतील झाडांच्या कत्तलीचा वाद पेटला, तीन याचिका दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या