बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्या टोळीचा कफ परेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिल्ली नोएडाहून एकाला अटक केली आहे. जयदिप शास्त्री (२९) असं या आरोपीचं नाव आहे. भारतातील नामांकित बँकेत कामाला लावण्याच्या बहाण्याने त्याने अनेकांना फसवल्याचं तपासात आता पुढं आलं आहे.


'अशी' केली फसवणूक

कफपरेड परिसरात राहणाऱ्या ज्योती चौधरी या तरुणीने सरकारी नोकरी मिळावी यासाठी जून २०१७ मध्ये आॅनलाईन साईटवर स्वत: चा बायोडेटा अपलोड केला होता. तिची बायोटेडातील माहिती चोरून काही दिवसांतच देवरूषी शर्मा या तरुणीने ज्योतीला फोन करून तिची एका नामकिंत बँकेत नोकरीसाठी निवड झाल्याचं सांगितलं.


पहिली अटक

त्याच बरोबर देवरूषीने 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली ज्योतीकडून १ लाख २१ हजार रुपये देखील उकळले. मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ज्योतीने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी देवरूषीला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली.


नोएडात काॅलसेंटर

मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नव्हतं. या गुन्ह्याप्रमाणेच त्यांनी देशाच्या विविध भागातून १५ हून अधिक जणांना गंडवल्याचं देवरूषीच्या चौकशीतून पुढे आलं. ही सर्व फसवणूक जयदीप दिल्लीजवळील नोएडा इथं बोगस काॅलसेंटर उघडून करत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली. शास्त्री मूळचा उत्तर प्रदेशतील रहिवासी असून न्यायालयाने त्याला ३ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अन्य किती जणांचा समावेश आहे. त्याचा पोलस शोध घेत आहेत.



हेही वाचा-

नीरव मोदीची ६३७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

देवनार डम्पिंग ग्राऊंडमधून सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा