Advertisement

गोरेगावमध्ये आढळला ६ फुटी अजगर


गोरेगावमध्ये आढळला ६ फुटी अजगर
SHARES

गोरगाव पश्चिमकडे शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ५.३० ते ६ फुटांचा अजगर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये एकच घबराट उडाली. रहिवाशांनी तात्काळ सर्प मित्रांशी संपर्क साधल्यावर सर्पमित्रांनी या अजगराला पकडलं.



मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे आणि मेट्रोच्या कामामुळे जमिनीला हादरे बसून हे वन्यजीव मानवी वस्तीकडे येत असल्याचं सर्पमित्रांचं म्हणणं आहे. तसंच गेल्या काही दिवासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळं या वनजीवांच्या घरात पाणी गेल्यामुळं हे वन्यजीव थेट शहरी वस्त्यांकडं वळत आहेत.


बीकेसीतही आढळला होता अजगर

वांद्रे-कुर्ला संकुला (बीकेसी) तील आयकर विभागाच्या कार्यालयामागील रस्त्यावर गुरूवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ६.३० फुटाचा अजगर आढळला होता. सर्पमित्रांनी हा अजगर पकडून वनविभागाकडे सोपवला.



७ महिन्यांत ८ अजगर आढळले

मागील ७ महिन्यांत एकूण ८ अजगर शहरात ठिकठिकाणी आढळून आले. तर गेल्या वर्षात एकूण ३५ अजगर आढळले होते.


इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) असं या जातीचा हा अजगर आहे. हा अजगर ५.३० ते ६ फूट लांबीचा आहे. हा अजगर ठाण्यातील वनविभागाकडे देण्यात येणार असून या अजगराची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळं जमिनीला हादरे बसत आहेत. तसंच, गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळं वन्यजीवांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळं हे वन्यजीव शहरी वस्तीत येत आहेत.
- अतुल कांबळे, सर्पमित्र



हेही वाचा-

लाटांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची समुद्रकिनारी गर्दी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा