पुण्यात मिनी लॉकडाऊन; संचारबंदीसह बस, बार, हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पुणे शहर व जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव झपाट्याने झाला आहे.  त्यामुळे पुढील सात दिवस पुणे जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारपासून या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

पुण्यातील कोरोनास्थितीची आढावा बैठक शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील महापालिकांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनला विरोध करण्यात आला. त्याऐवजी कठोर निर्बंध लादण्यावर एकमत झाले. 

बैठकीनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन लाॅकडाऊनची माहिती दिली. त्यानुसार, पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आता पुढील आठवड्यात म्हणजे शुक्रवारी निर्बंधांचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

असे आहेत निर्बंध

- बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहतील.

- हॉटेलमधून होम डिलिव्हरी सेवा सुरू राहणार.

- अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असेल.

- इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे.

- संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत.

- अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे.

- सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत.

- मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे.

- गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे.

- शाळा, महाविद्यालयं ३० एप्रिलपर्यंत बंद असणार आहेत. 


हेही वाचा -

मुंबईत मार्चमध्ये कोरोना रुग्ण संख्येत ४७५ टक्के वाढ

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या