Advertisement

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत कोरोना उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल की काय अशी शंका व्यक्त व्यक्त केली जात आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण
SHARES

मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत कोरोना उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे.  मुंबईत गुरूवारी कोरोनाचे तब्बल ८ हजार ६४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल की काय अशी शंका व्यक्त व्यक्त केली जात आहे. 

मुंबईत गुरूवारी ५ हजार ३१ रुग्ण बरे झाले आहेत.  मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ५५ हजार ६९१ वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांचा आकडा ११ हजार ७०४ झाला आहे मुंबईतील रिकव्हरी रेट सध्या ८४ टक्के आहे.

ठाण्यात गुरूवारी तब्बल १ हजार ४३२ नवीन रुग्ण आढळले.  तर ५७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ६८ हजार ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरूवारी ५ मृतांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ठाण्यात १३९५ रुग्णांनी जीव गमावला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात  ८९८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३ मृतांची नोंद झाली आहे. ६८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६९ हजार ९६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.



हेही वाचा -

  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद

  1. अखेर 'सनराईज' रुग्णालयाला लागलं टाळं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा