Advertisement

मुंबईत मार्चमध्ये कोरोना रुग्ण संख्येत ४७५ टक्के वाढ

मुंबई महापालिकेच्या आकेडवारीनुसार, ३१ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,१४,७१४ वर गेली आहे. तर एकूण ११,६८६ मृत्यू झाले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले आहेत.

मुंबईत मार्चमध्ये कोरोना रुग्ण संख्येत ४७५ टक्के वाढ
SHARES

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोजची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.  गुरुवारी मुंबईमध्ये ८६४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 

मार्च महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे ८८,७१० रुग्ण वाढले आहे. हा आकडा फेब्रुवारीच्या तुलनेत ४७५ टक्के जास्त आहे. या कालावधीत २१६ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या तुलनेत ही संख्या १८१ टक्के जास्त आहे. तर संपूर्ण राज्यात ६.६ लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्णांची प्रकरणे समोर आली जी फेब्रुवारीच्या तुलनेत ४०० टक्के जास्त आहेत.

मुंबई महापालिकेच्या आकेडवारीनुसार, ३१ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,१४,७१४ वर गेली आहे. तर एकूण ११,६८६ मृत्यू झाले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले आहेत. 

मुंबईत जानेवारीत १६ हजार ३२८ आणि फेब्रुवारीत १८ हजार ३५९ कोरोना रुग्ण आढळले.तर मार्चमध्ये हा आकडा ८८ हजार ७१० इतका आहे. मार्चमध्ये जानेवारीच्या तुलनेत ७२ हजार ३८२ अधिक रुग्ण आढळले आहेत. एकाच महिन्यात जवळपास ४७५ टक्के जास्त रुग्ण वाढले आहेत. 

जानेवारीनंतर फेब्रुवारीत मृत्यूची संख्या घटली होती. मात्र, मार्चमध्ये मृत्यूची संख्याही पुन्हा वाढली आहे. जानेवारीत २३७, तर फेब्रुवारीत ११९ मृत्यू झाले होते.  मार्चमध्ये  २१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीपेक्षा १८१ टक्क्यांनी मृत्यूचा आकडा वाढला आहे.

रग्ण बरं होण्याचा दरही घसरला आहे. फेब्रुवारीत रिकव्हरी रेट ९३ टक्के होता. तो  आता ८५ टक्क्यांवर आला आहे. अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजे ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्यासुद्धा ५१ हजार ४११  वर पोहोचली आहे. फेब्रुवारीत हा आकडा ९७१५ होता.

रुग्ण वाढण्याचं प्रमाणही गंभीर झालं आहे. फेब्रुवारीत रोजचा रुग्ण वाढीचा दर  ०.२८ टक्के होता, पण मार्चमध्ये हा दर १.३७ टक्के झाला. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीसुद्धा २४५ वरून ४९ दिवसांवर घसरला आहे.



हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा