माणकोलीत पाईपलाईन फुटल्याने ठाण्यात 24 तास पाणीकपात

file photo
file photo
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन सोमवारी, १७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता फुटल्याने ठाणेकरांना २४ तास पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. पापईलाईन फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

दुरुस्तीचे काम सुरू

या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम ठाणे महापालिकेच्या जलविभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

टीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी माहिती दिली की, "ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन सोमवारी पहाटे माणकोली नाक्यावर फुटली. टीएमसी पाणी विभागाचे कर्मचारी प्राधान्याने पाइपलाइन दुरुस्त करत आहेत. ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता आणि बुधवारपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. ठाणेकरांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

बोरिवली-ठाणे बोगद्याचे काम पावसाळ्यापर्यंत सुरू होणार

गोरेगाव : त्यांच्या मृत्यूने संतोष नगर परिसर हादरला, कुटुंबासाठी ठरला काळादिवस

पुढील बातमी
इतर बातम्या