कल्याणमध्ये (kalyan) राहणाऱ्या एका ३ वर्षांच्या (3 year minor girl) चिमुरडीला देखील कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झाल्याचं धक्कादायक वृत्त आहे. तिच्या वडिलांकडून तिला हा संसर्ग झाल्याचं म्हटलं जात आहे. या चिमुरडीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधीतांची संख्या वाढून ३९ वर गेली आहे.
ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
सोमवारी सकाळच्या सुमारास कोरोनाची लागण झालेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण दुबईहून मुंबईत आला हाेता. त्यातच कल्याण इथं कोरोना पॉझिटिव्ह (coronavirus positive) असलेल्या रुग्णाच्या ३३ वर्षीय पत्नी आणि ३ वर्षांच्या चिमुकलीची १४ मार्च रोजी तपासणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल सोमवारी आला असून, त्या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. या महिलेला आणि तिच्या मुलीला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
हेही वाचा- Coronavirus Updates: गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय
सध्या देशात कोरोनाचे १२६ रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (mumbai kasturba hospital) कोरोनाचे १४ रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांमध्ये मुंबईतील ६ आणि मुंबईबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे.
४५२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४९८ संशयित कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी ४५२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ४३३ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या १४ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ जानेवारी पासून आतापर्यंत २ लाख ४६ हजार ८४३ प्रवाशांचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे.
हेही वाचा- मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो बंद करणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर