Advertisement

मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो बंद करणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

मुंबईच्या वाहतूक (mumbai transport) व्यवस्थेचा कणा असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधील (mumbai local train) गर्दी मात्र ओसंडून वाहत आहे, या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल ट्रेन बंद करणार का? असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रसारमाध्यमांनी विचारला.

मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो बंद करणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर
SHARES

कोरोना व्हायरस (coronavirus) पसरत असल्याने एका बाजूला गर्दी होऊ नये म्हणून राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना मुंबईच्या वाहतूक (mumbai transport) व्यवस्थेचा कणा असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधील (mumbai local train) गर्दी मात्र ओसंडून वाहत आहे, या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल ट्रेन बंद करणार का? असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रसारमाध्यमांनी मंगळवारी विचारला.

हेही वाचा- Coronavirus : मुंबईत कोरोना व्हायरसचा पहिला बळी

आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक घेतली. या बैठकीला औषध, मनोरंजन, बँक इत्यांदी क्षेत्रातील कंपन्यांचे २० ते २५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत खासगी काॅर्पोरेट कंपन्या (private corporate office) बंद ठेवण्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांना लोकल ट्रेनच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला. 

त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, गर्दी टाळण्यासाठी सरकारने शाळा-काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात (mantralaya) विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांना मनाई करण्यात आली आहे. काॅर्पोरेट कंपन्यांचे अतिमहत्त्वाचे विभाग वगळता इतर विभाग बंद ठेवता येतील का, कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होमची मुभा देता येईल का? यावर चर्चा करण्यात आली. सोबतच सरकारी कार्यालये बंद ठेवण्यावरही सरकारचा विचार सुरू आहे, जेणेकरून रस्त्यावर कामाधंद्यांच्या निमित्ताने उतरणारी गर्दी कमी होईल, असं टोपे यांनी सांगितलं.

 ते पुढं म्हणाले, मुंबईच्या लोकल (mumbai local train) ट्रेनमध्ये रोज गर्दी ओसंडून वाहत आहे. कोरोना संदर्भात काळजी घेण्यासंदर्भातले सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत. प्रवासी एकमेकांना अक्षरश: खेटून प्रवास करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग (coronavirus) वाढण्याचा मोठा धोका आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दी आरोग्य विभागाअंतर्गत येत नसली, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकाेनातून आम्हाला नक्कीच त्याची चिंता वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री या विषयी संवेदनशील असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकल ट्रेनसोबत, मेट्रो इ. विषयांवर नक्कीच चर्चा करण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा- कोरोनाचा कहर - LIVE UPDATES

मुंबईतील ७५ टक्क्यांहून जास्त प्रवासी लोकल ट्रेन, मेट्रो, बसने आपापल्या कामाधंद्यावर जातात. या सेवा बंद झाल्यास मुंबईकरांना नाईलाजाने घरी बसावं लागेल. यामुळे गर्दी टळून कोरोनाचा संसर्ग कमी करता येईल, असं म्हटलं जात आहे.  
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा