Advertisement

Coronavirus : मुंबईत कोरोना व्हायरसचा पहिला बळी


Coronavirus : मुंबईत कोरोना व्हायरसचा पहिला बळी
SHARES

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जगभरात ६ हजारच्या आसपास या आजारानं बळी घेतले आहेत. यात भारतात ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ६४ वर्षीय वृद्धाचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते घाटकोपरमध्ये राहणारे होते.  


दुबईहून आले होते

घाटकोपरला राहणारा हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी दुबईहून आले होते. प्रकृती स्थिर नसल्यानं त्यांना हिंदुजामध्ये नेण्यात आलं होतं. तिकडे त्यांनी सुरुवातीला आपण दुबईहून आल्याचं सांगितलं नव्हतं. पण नंतर त्यांनी डॉक्टरांना काही दिवसांपूर्वी दुबईहून आल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आला. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयातील काही डॉक्टर आणि नर्सेसची कोरोनासाठी तपासणी करण्यात आली होती. तर काहींना खबरदारीचे उपाय म्हणून १४ दिवस घरीच राहण्याचे आदेश दिले होते.       


कस्तुरबात होते भरती

हिंदुजामधून ६४ वर्षीयं व्यक्तीला कस्तुरबामध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. पण मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाग्रस्त रूग्णाचा प्रवास

६ मार्च - दुबईहून परत आले. त्यानंतर त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटत असल्याने ते स्थानिक डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांना संशय आल्यानं त्यानी हिंदुजा रूग्णालयात जाण्यास सांगितले.

८ मार्च- हिंदुजा रूग्णालयात तपासणीसाठी गेले.

१२ मार्च - 12 मार्चपर्यंत उपचार सुरू होते. मात्र हिंदुजामध्ये अधिकच त्रास सुरू झाला आणि त्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा 12 मार्चला त्यांना कस्तुरबा रूग्णालयात कॉरेंनटाईन लक्षात ठेवण्यात आलं. त्यापाठोपाठ त्यांची घाटकोपरमधली सोसायटीचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं.

१३ मार्च- त्यांची पत्नी आणि मुलगा यांना कॉरेंनटाईन करून टेस्ट करण्यात आलं तेव्हा ते दोघंही पॉझिटिव्ह आढळले.

१७ मार्च- सकाळी त्यांचा कस्तुरबामधे मृत्य़ू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा दोघांवरही कस्तुरबामध्ये उपचार सुरू आहेत.


देशातील तिसरा बळी

कोरोनामुळे मुंबईतील हा पहिला बळी आहे. तर देशातील तिसरा बळी आहे. दिल्ली, कर्नाटका आणि मुंबई या राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वातावरण आणखी चिंताग्रस्त झाला आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा