Advertisement

Coronavirus Updates: १० रुपयांचं तिकीट ५० रुपयांना, गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

रेल्वे स्थानकातील गर्दी तिकीट कमी करण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus Updates: १० रुपयांचं तिकीट ५० रुपयांना, गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकातील गर्दी तिकीट कमी करण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

करोना व्हायरसची दहशत मुंबईसह राज्यभरात आहे. मुंबईत लोकल स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकिट १० रुपयांवरुन ५० रुपये करण्यात आलं आहे. मुंबईतील २०० स्थानकांवर या तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.

गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट महाग केलं असलं तरी, मुंबईची लाइफलाइन बंद होणार का याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून, लवकरच लोकलबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

लांब पल्ल्यांच्या या गाड्या बंद


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा