महाराष्ट्रात आढळले ३६ हजार ४३१ रेबीजचे रुग्ण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात ३६ हजार ४३१ रेबीजचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभेत याबाबत शुक्रवारी राज्याचे शहरी विकास मंत्री योगेश सागर यांनी माहिती दिली. रेबीज हा आजार कुत्र्यांच्या चावण्यानं होतो. 

प्रश्नोत्तराच्या तासाला माहिती

जानेवारीमध्ये रेबीजचे ७ हजार ३७८ रुग्ण, फेब्रुवारीमध्ये ४ हजार ६६४ रुग्ण, मार्चमध्ये ८ हजार ०३६ रुग्ण, एप्रिलमध्ये १० हजार ६४० रुग्ण आणि मे महिन्यात ५ हजार ७३१ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे शहरी विकास मंत्री योगेश सागर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

ठेकेदाराला दंड

याबाबत योगेश जाधव यांनी मान्य केलं की, १० जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत या कालावधीत लसीचा पुरवठा कमी झाला होता. याचं कारण लसीचा दर्जा कमी होता. मात्र, आता लसीची कमतरता नाही. लसीचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारानं उशीर केल्यामुळं ठेकेदाराला दंड ठोठावल्याचं म्हटलं आहे.


हेही वाचा -

मोबाईल चोरल्यानं रेल्वेच्या कर्मचाऱ्याला मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप

डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या