Advertisement

डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यामुळे या पुतळ्याची उंची ३५० फुटांवरून आता ४५० फूट होणार आहे.

डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार- मुख्यमंत्री
SHARES

दादरच्या इंदू मिलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीवरून मध्यंतरी वाद निर्माण झाला होता. यावर खुलासा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यामुळे या पुतळ्याची उंची ३५० फुटांवरून आता ४५० फूट होणार आहे. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 

आंदोलनाचा इशारा

रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने कमी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशी करून सर्वांपुढे सत्य ठेवण्याचाी मागणी केली होती. अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. 

सर्व परवानग्या

डाॅ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डाॅ. आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी सीआरझेड (CRZ) अंतर्गत येणाऱ्या परवानग्यांसोबत इतर सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. इंदू मिल परिसरातील झाडं तोडण्याची महापालिकेची परवानगी मिळाली आहे. सध्या मिल परिसरातील जमीन सपाट करण्याचं काम करण्यात येत आहे. मिलमध्ये समुद्राचं पाणी येऊ नये म्हणून भिंतही उभारण्यात येत आहे. 

‘असं’ असेल स्मारक

स्मारकासाठी ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येत असून ६ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांना स्मारकात येता येईल. या स्मारकात ग्रंथालय, ई-लायब्ररी, विपश्यना केंद्र तसंच सभागृह असेल, अशी माहितीही त्यांनी दिली. डॉ. आंबेडकर यांचा पुतळा चीनमध्ये तयार करण्यात येत असून या पुतळ्याचे सुटे भाग मुंबईत आणून जोडले जातील, असं पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार यांनी सांगितलं होतं.हेही वाचा-

आंबेडकर स्मारकाचा मुद्दा पेटणार! ६ डिसेंबरला आंबेडकर अनुयायी धडकणार इंदू मिलवर

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी? आनंदराज आक्रमक, आंदोलनाचा इशारासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा