मोबाईल चोरल्यानं रेल्वेच्या कर्मचाऱ्याला मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातील तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यानं मोबाईल चोरल्यानं मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याचं नाव अद्याप समजलेलं नाही.

मोबाईल चोरल्यानं रेल्वेच्या कर्मचाऱ्याला मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप
SHARES

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातील तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यानं मोबाईल चोरल्यानं मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्याचं नाव अद्याप समजलेलं नाही. मात्र याघटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवा कार्यकर्त्या नंदिनी बेलेकर या आपल्या मैत्रिणीसोबत मुंबई सेंट्रल स्थानकातून तिकीट खरेदी करून खारला जात होत्या. त्यावेळी नंदिनी यांच्या मैत्रिणीचा मोबाईल तिकीट काऊंटरवरच राहिला. तिकीट घेतल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर मोबाईल नसल्याचं लक्षात येताच अर्ध्या वाटेतून तिकीट काउंटरवर परत येऊन नंदिनी आणि त्यांच्या मैत्रिणीनं तिकीट काढणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मोबाईलबाबत विचारणा केली. त्यावेळी कर्मचाऱ्यानं आपल्याला माहिती नाही असं सांगत उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरूवात केली.


मोबाईल नसल्याचा आव

त्यावेळी मोबाईलचं कव्हर जवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्यानं नंदिनी आणि तिच्या मैत्रिणीनं स्टेशनवरील सीसीटीव्ही दाखविण्याची विनंती केली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यानं आपल्याकडं मोबाईल नसल्याचा आव आणणाऱ्या त्या रेल्वे कर्मचाऱ्याजवळच मोबाईल सापडला.

कोणतीही तक्रार नाही

या कर्मचाऱ्यानं मोबाईलमधील सिमकार्ड काढून टाकलं होतं. त्यामुळं संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यास चांगलाच चोप दिला. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

मंत्रालयात दूषित पाण्यानं १००हून अधिक कर्मचाऱ्यांना उलट्या व जुलाब

टॅक्सी संघटनांची २५ रुपये भाडेवाढीची मागणी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा