Advertisement

मंत्रालयात दूषित पाण्यानं १००हून अधिक कर्मचाऱ्यांना उलट्या व जुलाब

मंत्रालयातील पिण्याच्या दूषित पाण्यामुळं १००हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे.

मंत्रालयात दूषित पाण्यानं १००हून अधिक कर्मचाऱ्यांना उलट्या व जुलाब
SHARES

मंत्रालयातील पिण्याच्या दूषित पाण्यामुळं १००हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून कर्मचाऱ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पिण्याच्या दुषित पाण्यामुळं झालेल्या त्रासानं अनेक कर्मचारी कार्यालय सोडून गेले तर, काहींनी रजा घेतली.

आरोग्याचा प्रश्न

पिण्याच्या दुषित पाण्यामुळं कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी दूषित पाण्यामुळं कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची कबुली सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसंच, 'या प्रश्नावर आपण माहिती घेऊन येत्या सोमवारी निवेदन करणार आहोत’, असं सभागृह नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात म्हटलं.

पाण्याच्या टाक्या साफ

महापालिकेचा मंत्रालयात पाणीपुरवठा होतो. मंत्रालयातील पाण्याच्या टाक्या २० जून रोजी स्वच्छ आणि साफ करण्यात आल्या आहेत. तसंच, प्युरिफायरची तपासणी व दुरूस्ती केली होती. मात्र तरीसुद्धा या प्रकार कसा घडला याबाबत २ दिवसांत संपूर्ण माहिती घेऊन सोमवारी सभागृहात निवेदन करू, असं चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा -

माझगाव डाॅक इथं आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेला आगसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा