Advertisement

माझगाव डाॅक इथं आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेला आग

माझगाव डॉक इथं उभ्या असलेल्या आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेवर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजता आग लागली. या आगीत १ कर्मचारी ठार झाल्याचं समजत आहे.

माझगाव डाॅक इथं आयएनएस विशाखापट्टणम युद्धनौकेला आग
SHARES

माझगाव डॉक इथं उभ्या असलेल्या आयएनएस विशाखापट्टणम (INS Visakhapatnam) या युद्धनौकेवर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजता आग लागली. या आगीत १ कर्मचारी ठार झाल्याचं समजत आहे. 

या युद्धनौकेच्या बांधणीचं काम पूर्ण झालं असून सध्या माझगाव डाॅक या युद्धनौकेची समुद्री चाचणी सुरू आहे. त्यातच सायंकाळी युद्धनौकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डेकवर आग लागली. आग लागल्याची वर्दी मिळताच नौदलाच्या अग्निशामकांसह मुंबई महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखलं झालं असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

घटनास्थळी आतापर्यंत १५ बंब दाखल झाले असून आग अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही.  ही आग तिसऱ्या लेव्हलची असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. आयएनएस विशाखापट्टणम ही नाैदलाच्या ताफ्यातील पहिली P15-B स्टेल्थ विनाशिका आहे. 

युद्धनौकेची वैशिष्ट्य

या विनाशिकेचं जलावतरण २०१५ मध्ये करण्यात आलं होतं.कलकत्ता वर्गाच्या ‘पी-१५ बी’ स्टेल्थ विनाशिकेचं डिझाईन भारतात तयार करण्यात आलं आहे. ही विनाशिका ३ हजार टन वजनाची असून तिची लांबी १६३ मीटर आहे. तिला चार गॅस टर्बाईन्सच्या माध्यमातून इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. या विनाशिकेचा वेग प्रति तास ३० सागरी मैल आहे. या विनाशिकेवर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रं, अत्याधुनिक शस्त्रास्त्रं, सेन्सर्स, अत्याधुनिक कृती माहिती यंत्रणा, आधुनिक ऊर्जा वितरण यंत्रणा बसवण्यात आली आहेत. ही विनाशिका अणू-रासायनिक-जैविक  युद्धासाठी सक्षम असून हवाई संरक्षण यंत्रणा, जहाजविरोधी क्षेपणास्त्र बसवल्याने तिचा बचाव भक्कम झाला आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा