महाराष्ट्रातल्या ४४ अधिकाऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी गौरव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याला जागत आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्याचा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ६३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांची पुरस्कारांसाठी घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ अधिकाऱ्यांना पुरस्कार

देशभरातून एकूण ६३२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा राष्ट्रपती पुरस्कार आणि पोलिस गुणवत्ता पदक जाहिर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ अधिकाऱ्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. राष्ट्रपती पुरस्कारांच्या यादीत अतिरिक्त पोलिस महासंचालक (एसीबी) बीपीनकुमार सिंग, सहाय्यक पोलिस आयुक्त दिनेश जोशी, भास्कर महाडिक सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू नगाले यांचा समावेश आहे.

मुंबई पोलिस दलातील १५ अधिकाऱ्यांनाही पुरस्कार

राज्यपालांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या पोलिस गुणवत्ता पदकासाठी मुंबई पोलिस दलातील परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्यासह १५ जणांची वर्णी लागली आहे. उमाप यांच्यासह सायन पोलिस ठाण्याचे एसीपी शरद नाईक, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे, खार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सचिन कदम, डी. जी. ऑफिसमधील महिला पोलिस निरीक्षक धनश्री करमरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल परब, पोलिस उपनिरीक्षक सत्यवान राऊत, सह पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर शेलार, मनोगर खानगावकर, हेड काॅन्स्टेबल गणपती ढापले, कृष्णा जाधव, पांडुरंग तलवडेकर, अरूण कदम, दयाराम मोहिते, भानुदास मानवे, दत्ताञय कुडाले या मुंबईतील १५ अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.


हेही वाचा -

आणि 'ठाकरे'च्या शोमध्ये शिवसैनिकांनीच घातला गोंधळ!

Movie Review - जोखडांची बेडी तोडणाऱ्या शूर राणीची कथा


पुढील बातमी
इतर बातम्या