Advertisement

आणि 'ठाकरे'च्या शोमध्ये शिवसैनिकांनीच घातला गोंधळ!

'ठाकरे' सिनेमा पाहण्यासाठी सकाळपासूनच वाशी, तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे या परिसरातून शिवसैनिकांनी आणि प्रेक्षकांनी रघुलीलामधील आयनाॅक्स सिनेमागृहात मोठी गर्दी केली होती. मात्र 'ठाकरे' सिनेमाचं पोस्टर लावलं नसल्यानं गोंधळ घालत शो बंद पाडला.

आणि 'ठाकरे'च्या शोमध्ये शिवसैनिकांनीच घातला गोंधळ!
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'ठाकरे' सिनेमाच्या शो दरम्यान कोणी विरोधकांनी किंवा इतर कोणत्याही संघटनांनी नव्हे, तर खुद्द शिवसैनिकांनीच गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये शुक्रवारी सकाळी शिवसैनिकांनी ठाकरे सिनेमाचं पोस्टर लावलं नसल्यानं गोंधळ घालत शो बंद पाडला.


सर्वच सिनेमागृहाबाहेर मोठी गर्दी

गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांसह प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेनं ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा चंग बांधत वडाळ्यातील आयनाॅक्स सिनेमागृहाबाहेर शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासूनच शिवसैनिकांसह प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांचं-प्रेक्षकांचं स्वागत यावेळी करण्यात आलं. तर इतर ठिकाणच्या सिनेमागृहातही ठाकरे सिनेमाला चांगली पसंती मिळताना दिसली. असं असताना नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील रघुलीला मॅालमध्ये असलेल्या आयनॅाक्स सिनेमागृहात मात्र गोंधळ पाहायला मिळाला.


वाशीत गोंधळ

'ठाकरे' सिनेमा पाहण्यासाठी सकाळपासूनच वाशी, तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे या परिसरातून शिवसैनिकांनी आणि प्रेक्षकांनी रघुलीलामधील आयनाॅक्स सिनेमागृहात मोठी गर्दी केली होती. पण सिनेमागृहाबाहेर सिनेमाचं पोस्टरच नसल्याने शिवसैनिकांना संताप आला. संतापलेल्या शिवसैनिकांनी मॅाल परिसराबाहेरच घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत 'ठाकरे'चं पोस्टर लावलं जात नाही, तोपर्यंत आंदोलन न थांबवण्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली.


पोस्टर नसल्यानं गोंधळ

शिवसैनिकांच्या घोषणाबाजीमुळे रेल्वे स्थानक तसंच बस स्टँडवरील प्रवाशांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला. सुरुवातीला थोडा वेळ नेमकं काय घडलं याबाबत कोणालाच काहीच ठाऊक नव्हतं, पण नंतर सर्व प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. 'ठाकरे' प्रदर्शित होऊनही आयनॅाक्समध्ये सिनेमाचं एकही पोस्टर लावण्यात आलेलं नव्हतं. याउलट इतर हिंदी आणि इंग्रजी सिनेमांची पोस्टर्स होती. ते पाहून शिवसैनिकांचा राग अनावर झाला. शिवसैनिकांचा रोष अधिक वाढून वातावरण आणखी तापण्याआधीच मल्टिप्लेक्स प्रशासनाने अर्ध्या तासाच्या आत पोस्टर्स लागतील असं आश्वासन दिल्यावर शिवसैनिक शांत झाले.


हेही वाचा -

संभाजी ब्रिगेडची 'ठाकरे'ला धमकी

'मनसे'च्या पानसेंना राऊतांनी केलं ना'राज'?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा