नवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई (munbai) तील मालाड (malad) मध्ये इमारत कोसळून ११ जणांचा बळी गेला आहे.  पावसाळा सुरू झाला असून अतिधोकादायक इमारतींची पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई (navi mumbai) तही धोकादायक इमारतींचा (dangerous building) प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या वाढतच आहे. यंदा ३२ धोकादायक इमारतीं वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई आता धोकादायक इमारतींची संख्या ४७५ झाली आहे. 

नवी मुंबई महापालिका (navi mumbai municipal corporation) कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचं विभागवार सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात ४७५ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा सी-१ प्रवर्गामध्ये मोडणा-या ६५ इमारती, इमारत रिकामी करून संचरचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-२ ए प्रवर्गामध्ये मोडणा-या ९४ इमारती, इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-२ बी प्रवर्गामध्ये मोडणा-या २५९ इमारती तसंच इमारतीची किरकोळ दुरूस्ती अशा सी-३ प्रवर्गामध्ये मोडणा-या ५७ इमारती आहेत. 

धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महापालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर 'विभाग' सेक्शनमध्ये 'अतिक्रमण विभाग' माहितीच्या सेक्शनमध्ये उपलब्ध आहे.   

पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा वापर तात्काळ थांबविण्यात यावा असं आवाहन नवी मुंबई महापालिकेनेे केलं आहे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास ही इमारत तसेच बांधकाम कोसळल्यास होणाऱ्या नुकसानीस संबधित व्यक्ती जबाबदार असणार आहेत. नवी मुंबई महापालिका यास जबाबदार राहणार नाही, असं पालिकेकडून सूचित करण्यात आलं आहे.

विभाग            अतिधोकादायक    धोकादायक इमारती

बेलापूर                     ८                   १००

नेरूळ                       ६                    ४५

वाशी                        २३                  २११

तुर्भे                         १५                    ६२

कोपरखैरणे                   ५                    १७

घणसोली                     २                    १६

ऐरोली                        ५                     १६

दिघा                          १                      ८

एकूण                         ६५                   ४७५


हेही वाचा -

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार

पुढील बातमी
इतर बातम्या