Advertisement

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय

कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळं राज्यातील लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? ८ दिवसात होणार निर्णय
SHARES

कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळं राज्यातील लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप काही जिल्ह्यांमध्ये बरे होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले टाकण्याचे संकेत दिले आहेत. 

याबाबत आपलं माय महानगर या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, येत्या ८ दिवसात पुन्हा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी स्पष्ट केलं. रविवारची आकडेवारी पाहता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. तरीही आजच यावर ठोस असे भाष्य करता येणार नाही. पुढचे ८ दिवस या परिस्थितीत काय बदल होतात ते पाहावे लागेल. सध्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे.

रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील, असे वडेट्टीवार यांनी म्हटलं. पुढच्या ८ दिवसांनंतर याबाबत पुढचे पाऊल उचलण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट किती आहे आणि ऑक्सिजन बेड्स किती भरलेले आहेत त्या आधारावर स्तर निश्चित करून त्यानुसार सध्या निर्बंध लावले जात आहेत किंवा त्यात सूट दिली जात आहे.

यासाठी ५ स्तर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. राज्यातील जिल्हे आणि प्रमुख महानगरे यांची यात वेगवेगळी वर्गवारी करण्यात आलेली आहे. यानुसार ५ टक्क्यांपर्यंत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.




हेही वाचा -

प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू, मिळतील 'हे' फायदे

फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा