बेस्टमधील कोरोनामृतांची संख्या ८ वर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कोरोनानं चांगलंच घेरलं आहे. कोरोनाशी लढताना मृत्यू पावलेल्या बेस्ट कामगारांची संख्या रविवारी ८ वर पोहोचली आहे. या वाढत्या संख्येमुळं बेस्टच्या कामगारांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

बेस्टच्या आरोग्य विभागाकडून १४,४८६ कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तर, करोनाबाधित कामगारांच्या संपर्कात आलेल्या एक हजार कामगारांचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरातच विलगीकरण केले आहे. प्रकृती उत्तम असल्याने यातील ९७१ कामगार पुन्हा सेवेत हजर झाले आहेत. तर, जोखीम असलेल्या तसेच आजारी असलेल्या दोन हजारांहून अधिक कामगारांना घरी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या बेस्ट कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आलं आहे. बेस्टकड कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार देण्याकरीता पैसे नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या परिस्तिथित कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येऊ नये यासाठी महापालिकेने उपक्रमाला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. बेस्टला पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या १५०० कोटींच्या अनुदानातून १२५ कोटी रुपये एप्रिलच्या पगारासाठी देण्यात आले आहेत.


हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत

मुंबईत महिन्याभरात इतके टक्के मुंबईकर क्वॉरंटाइन


पुढील बातमी
इतर बातम्या