Advertisement

महापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत

बेस्टकड कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार देण्याकरीता पैसे नसल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत
SHARES
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात बेस्ट अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवत आहे. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या बेस्ट कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आलं आहे. बेस्टकड कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार देण्याकरीता पैसे नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या परिस्तिथित कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येऊ नये यासाठी महापालिकेने उपक्रमाला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. बेस्टला पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या १५०० कोटींच्या अनुदानातून १२५ कोटी रुपये एप्रिलच्या पगारासाठी देण्यात आले आहेत.

१५०० कोटींपैकी आतापर्यंत ६२५ कोटी रुपये उपक्रमाला देण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. गतवर्षी बेस्टला २१२६.३१ कोटींची मदत करण्यात आली. तर २०२०-२१ च्या पालिकेच्या अर्थसंकल्पात आणखी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रतिमहिना १२५ कोटी याप्रमाणे ही मदत देण्याचे निश्चित करण्यात आहे. एप्रिलच्या पगारासाठी आर्थिक चणचण असल्याने बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी पालिकेकडे १५० कोटीची मागणी केली मात्र कोरोनामुळे स्थायी समितीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याने प्रशासनाने १२५ कोटी रकमेला मंजुरी दिली आहे.

सन २०२०-२१ चे अर्थसंकल्पीय अंदाज स्थायी समितीने मंजूर करून महापालिकेकडे अंतिम स्वीकृतीकरिता सादर केले आहेत. मात्र, पालिकेने ते पूर्णत: स्वीकारलेले नाही. परंतु, लोकल बंद असल्यानं 'बेस्ट'च्या सेवेत कोणताही खंड पडू नये तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची प्रवासाची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी १२५ कोटी बेस्टला देण्यात आले आहेत. याबाबतचा मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.



हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत

भूमिपुत्रांनो सज्ज व्हा! रोजगाराची संधी सोडू नका : मुख्यमंत्री



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा