Advertisement

भूमिपुत्रांनो सज्ज व्हा! रोजगाराची संधी सोडू नका : मुख्यमंत्री

ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

भूमिपुत्रांनो सज्ज व्हा! रोजगाराची संधी सोडू नका : मुख्यमंत्री
SHARES

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा अवलंबवण्यात आला आहे. तरीदेखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'जसे पंतप्रधान मोदीं म्हणतात आत्मनिर्भर बना, तसा महाराष्ट्र आत्मनिर्भर होण्यासाठी ग्रीन झोनमधल्या नागरिकांनी पुढे यावं.


उद्योग सुरू झाले

आजपर्यंत राज्यात ५० हजार उद्योगांना परवानगी दिली आहे. ५ लाखांच्या आसपास मजूर यामध्ये काम करत आहेत. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबले गेले आहे. ज्यामुळे जग थांबले आहे. सरकारला ६ महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

एका हिंमतीनं आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. ४० हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत. मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ.


भूमिपूत्रांना आवाहन

मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा, ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे. आता जे उद्योग सुरू होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावं. कोरोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन आपल्याला कोरोना विरहित ठेवणं हे आपल्यापुढचे आव्हान आहे. आता ग्रीनझोनमधल्या माणसांनी मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझ्या महाराष्ट्रासाठी पुढे यावे.'

'ही' आहेत मोठी आवाहनं

आपल्यासमोर दोन मोठी आवाहनं आहे, ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळला नाही पाहिजे. ग्रीन झोमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही आणि रेड झोन ग्रीनमध्ये आणायचा आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा हे आपले घोषवाक्य आहे.हेही वाचा

लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखी अवस्था होईल : मुख्यमंत्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा