Advertisement

मुंबईत महिन्याभरात इतके टक्के मुंबईकर क्वॉरंटाइन

मुंबईत १५ एप्रिलपर्यंत ४३ हजार २४९ लोक होम क्वॉरंटाइन होते. १३ मेपर्यंत या संख्येत २.३४ लाखाने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत महिन्याभरात इतके टक्के मुंबईकर क्वॉरंटाइन
SHARES

कोरोना ग्रस्तांच्या संपकार्त आल्यानं संबंधिताला क्वॉरंटाइन करण्यात येतं. त्यानुसार, मुंबईत गेल्या महिन्याभरात क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईत महिन्याभरात क्वॉरंटाइन होणाऱ्यांची संख्या ४४१ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईत १५ एप्रिलपर्यंत ४३ हजार २४९ लोक होम क्वॉरंटाइन होते. १३ मेपर्यंत या संख्येत २.३४ लाखाने वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिलपर्यंत मुंबईत १० हजार ९६८ लोक होम क्वॉरंटाइन होते. ही संख्या १७ एप्रिलपर्यंत ५३ हजार ११८ झाली आहे. होम क्वॉरंटाइन होणाऱ्यांच्या संख्येत अवघ्या ११ दिवसांत ३८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणं क्वॉरंटाइन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एखाद्या व्यक्तिमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळल्यास अशा लोकांनाही क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हलवले जातं. 

होम क्वॉरंटाइन असलेल्या २.३४ लाख लोकांपैकी १२,६३६ लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसंच, ९५ हजार १५४ जणांनी त्यांचा १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

सध्या मुंबईत एकूण ६६१ कंटेन्मेंट झोन आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या २ हजार ६०० एवढी होती. महापालिकेने कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करत सील बिल्डिंग ही नवी वर्गवारी तयार केली आहे. त्यानुसार मुंबईत एकूण १११० सील इमारती आहेत.



हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत

भूमिपुत्रांनो सज्ज व्हा! रोजगाराची संधी सोडू नका : मुख्यमंत्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा