आॅक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण येत असल्याने या महिन्यात अनेकजण सेलिब्रेशन, पार्टीचं आयोजन करण्याच्या मूडमध्ये असतील. पण कुठल्याही पार्टीचं प्लानिंग करण्याआधी जरा ‘ड्राय डे’पण चेक करून घ्या. कारण याच महिन्यात विधानसभा निवडणुकीचा उत्सव साजरा होत असल्याने ‘ड्राय डे’ ची संख्या देखील वाढली आहे. उगाच कुणाच्या आनंदावर विरजण पडायला नको, म्हणून दक्षता…
आॅक्टोबर महिन्यांत एकूण ८ ‘ड्राय डे’ चा सामना तळीरामांना करावा लागू शकतो. त्यातील पहिला ‘ड्राय डे’ बुधवारी २ आॅक्टोबरला येत आहे. या दिवशी गांधी जयंती असल्याने वाइन शाॅपचं शटर दिवसभर खालीच राहील. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात ८ आॅक्टोबरला ‘ड्राय डे’ असेल कारण या दिवशी दसरा हा सण आहे. त्यामुळे या दिवशी सर्व प्रकारच्या मद्याची दुकानं बंद असतील. रविवारी १३ आॅक्टोबरला वाल्मिकी जयंती असल्याने या दिवशी ‘ड्राय डे’ असेल.
पाठोपाठ सोमवारी २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. आचारसंहितेनुसार मतदानाच्या ४८ तास आधी मद्यविक्रीस मनाई करण्यात येते. त्यानुसार सर्व प्रकारच्या मद्याची दुकानं बंद असतील. तर १९-२० ऑक्टोबर असे सलग २ दिवस राज्यात ‘ड्राय डे’ असेल.
हेही वाचा-
मुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ तारखेला मतमोजणी