Advertisement

मुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच

अनेक रेस्टॉरंटमध्ये पिझ्झाला ट्वीस्ट देत त्याला वेगळ्या पद्धतीनं खवय्यांपुढे सादर केलं गेलंय. आज आम्ही तुम्हाला अशाच हटके पिझ्झांची माहिती देणार आहोत.

मुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच
SHARES

नवीन वर्षाची पार्टी असो किंवा सहज मित्रांसोबत ठरलेला प्लॅन असो. सर्वच भेटींमधला प्रमुख पाहुणा म्हणजे थेट इटलीतून आलेला पिझ्झा! अशा या पिझ्झाचे अनेक प्रकार आहेत. बदलत्या खाद्यसंस्कृतीनुसार पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार उदयास आले. अनेक रेस्टॉरंटमध्ये पिझ्झाला ट्वीस्ट देत त्याला वेगळ्या पद्धतीनं खवय्यांपुढे सादर केलं गेलंय. आज आम्ही तुम्हाला अशाच हटके पिझ्झांची माहिती देणार आहोत.


१) पावभाजी पिझ्झा

खरंतर पावभाजी हा पदार्थ प्रचंड व्हर्सटाईल आहे. मोठमोठ्या शेफ्सनाही एखाद्या पदार्थाला ट्विस्ट देऊन काही तरी नवनिर्मिती करायची असेल तर आधी आठवण पावभाजीचीच येते. म्हणूनच तर पंचतांरांकित रेस्टॉरंटमध्ये पावभाजीला ट्वीस्ट देत एक हटके पदार्थ सादर केले जातात. असाच एक पदार्थ सादर केला आहे लोअर परेल इथल्या रोलिंग पीन बेकरी कम रेस्टॉरंटमध्ये.


रोलिंग पीनमध्ये पावभाजी पिझ्झा हा हटके पदार्थ सादर केला आहे. पाव भाजी पिझ्झा नावाचा पदार्थ म्हणजे तर इटालियन पदार्थांचं मुंबय्या व्हर्जन म्हणावं लागेल. पिझ्झावर साधारण नेहमी ज्या भाज्या असतात त्याऐवजी पाव भाजीची भाजी टाकली जाते. त्यावर चिजचा थर अॅड केला जातो. त्यामुळे तुम्ही रोलिंग पीनमध्ये गेलात तर बॉम्बे स्पाईस पिझ्झा पाय नावाचा पावभाजीच्या चवीचा अनोख्या पिझ्झाचा आस्वाद नक्की घ्या.

कुठे : १२, जनता इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बापट रोड, पॉलेडियमच्या समोर, लोअर परेल


२) पिझ्झा फॉन्ड्यू आणि चॉकलेट पिझ्झा

चिलीझामधले एकाहून एक पिझ्झा हे वैशिष्टय़पूर्ण आहेत. त्यात अनेक वेगवेगळे भाग आहेत. त्यातही हे वैविध्य केवळ पिझ्झात टाकलेल्या विविध भाज्यांवर नाही तर त्यातल्या वेगवेगळया प्रकारच्या चीझमध्येही हे वैविध्य जपण्यात आले आहे. पनीर पंच, हवाइन फँटसी, हॉट स्टफ अशा विविध नावांचे हे पिझ्झा आहेत. त्यातही या पिझ्झाबरोबर खाण्यासाठीचे खास फॉन्ड्यू इथं आहेत. त्यात डबल चीझ बर्स्ट, व्हिट थीन कर्स्ट यासारखे फॉन्ड्यू असतात.


या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारच्या चॉकलेट पिझ्झाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. खुसखुशीत पिझ्झा बेस, त्यावर गरमागरम चॉकलेट सॉस, त्यात व्हाइट चॉकलेटचे काही तुकडे. ही चव वाढवण्याकरता अननसाचे काप आणि त्यावर सजावटीसाठी टाकलेल्या जेम्ससारख्या गोळ्या. हा पिझ्झा आपल्यासमोर येतो तो गरमागरम. तो खाण्यासाठी मात्र थोडासा संयम पाळला पाहिजे.

कुठे : तळ मजला आणि पहिला मजला, मोरया ब्ल्यूमून बिल्डिंग, न्यू लिंक रोड, लोखंडवाला, अंधेरी (पश्चिम)


३) मॅगी पिझ्झा

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मॅगी आवडते. सर्वांच्या आवडीची 'मेरी मॅगी' जर तुम्हाला पिझ्झामध्ये देखील मिळाली तर?  पवईतील 'द हंग्री हेड कॅफे'त मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा मुख्य भाग मॅगी आहे. मॅगी आणि पिझ्झा या दोन्हींच्या चाहत्यांसाठी बनवलेलं कॉम्बिनेशन म्हणजेच 'मॅग्गीझा' हा वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र करून बनवला जातो. त्यातही ओये पंजाबी मॅग्गीझा हे ऍरबीटा सॉस, पनीर टिक्का, चीज आणि मॅग्गी यांचं अनोखं समीकरण चांगलंच हिट आहे.

कुठे : १, हाकोण, पवई प्लाझाच्या मागे, पवई


४) चाट पिझ्झा

आतापर्यंत चाट आणि पिझ्झा हे दोन वेगवेगळे प्रकार होते. पण आता चाटच्या चवीमध्ये तुम्हाला पिझ्झाचा आस्वाद घेता येणार आहे. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील 'ग्लोकल जन्क्शन' मध्ये 'चाट पिझ्झा' हा हटके प्रकार उपलब्ध आहे.


चाट पापडीच्या बेसवर चीज, पास्ता, ऑलिव्ह, हॅलपीनो टाकून त्यावर बारीक शेव आणि चाट मसाला घालून हा पिझ्झा बनवला जातो. मुंबईच्या गल्लोगल्ली मिळणाऱ्या चाटचं हे इटालियन रूप खवय्यांच्या भलतंच पसंतीस उतरत आहे.

कुठे : तळ मजला, नेहरू सेंटर, डॉ. अनी बसंत रोड, नेहरू प्लॅनेटोरीयमच्या समोर, वरळी


५) सीफुड पिझ्झा

तुम्ही सीफुडचे चाहते आहात मग तुमच्यासाठीच हा पिझ्झा तयार करण्यात आला आहे. कॅफे फ्री इंडिया या कॅफेमध्ये तुम्हाला सीफुड पिझ्झाचा आस्वाद घेता येईल. पिझ्झाच्या क्रस्टवर फिशचे चंक्स, स्किव्ड, कोळंबी आणि भरपूर चीज असं टाकून हा पिझ्झा सर्व्ह केला जातो.


कुठे : एनएम जोशी मार्ग, दीपक सिनेमाच्या विरूद्ध, लोअर परेल



हेही वाचा

श्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव

गल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली भाग- २


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा