दिलासादायक 'आधार'! लिंक करण्यासाठी कोणतीही डेडलाईन नाही!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आधार कार्ड सक्तीचे करण्यापासून ते सर्व सरकारी सेवा आणि बँकिंग सेवा आधारशी संलग्न करण्यापर्यंत आधार व्यवस्था नेहमीच वादात राहिलेली आहे. मात्र, आता पहिल्यांदाच आधार कार्डबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आधारशी सर्व सरकारी सेवा आणि बँकिंग सेवा संलग्न करण्यासाठी कोणतीही डेडलाईन नसल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

३१ मार्चपर्यंत वाढवली होती मुदत

आधारशी सर्व सेवा संलग्न करण्यासाठी सरकारकडून अनेकदा डेडलाईन देण्यात आल्या आहेत. नुकतीच ही डेडलाईन ३१ डिसेंबरपासून ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, आता यासाठी कोणतीही डेडलाईन नसल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.

यासंदर्भात शाम दिवान यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ज्या व्यक्तींना आधारशी इतर सेवा संलग्न करायच्या नाहीत, त्यांच्यावर सक्ती का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

१४ डिसेंबरला होणार पुढची सुनावणी

मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. आधारबाबत १४ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.


हेही वाचा

'जेईई'च्या विद्यार्थ्यांनो आधार कार्डावरील नावात दुरूस्ती करायचीय? तर हे करा

पुढील बातमी
इतर बातम्या