Advertisement

'जेईई'च्या विद्यार्थ्यांनो आधार कार्डावरील नावात दुरूस्ती करायचीय? तर हे करा


'जेईई'च्या विद्यार्थ्यांनो आधार कार्डावरील नावात दुरूस्ती करायचीय? तर हे करा
SHARES

देशभरातील नामांकीत इंजिनीअरिंग काॅलेजांतील प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक मंडळा (सीबीएसई)च्या माध्यमातून संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्याचं शाळेत नोंदवलेलं संपूर्ण नाव आणि आधार कार्डवरील नाव एकाच क्रमाने, एकसमान असलं पाहिजे, अशी सूचना ‘सीबीएसई’ने केली आहे. यामुळे ही परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या नावात चुका आहेत, अशा विद्यार्थ्यांनी नावात दुरूस्ती करण्यासाठी आधार केंद्र शोधण्याकरीता धावपळ सुरू केली आहे.


चिंतेचं कारण नाही

पण, यांत फार चिंता करण्याचं कारण नाही. कारण UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अगदी घरबसल्या नजीकच्या आधार केंद्राची माहिती मिळू शकते. तिथं जाऊन तुम्ही आरामात आधार कार्डवरील तुमच्या नावाची दुरूस्ती करू शकता. त्यासाठी ना पैसे खर्च करण्याची गरज, ना गर्दीत उभं राहण्याची गरज.


काय म्हणणं आहे ‘सीबीएसई’चं

‘सीबीएसई’ ने नुकतंच एक माहिती पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात नमूद केल्यानुसार २०१८ या शैक्षणिक वर्षातील ‘जेईई’च्या मुख्य प्रवेश परीक्षेसाठी आनलाईन अर्ज भरताना यंदा आधारक्रमांक किंवा आधार कार्ड नोंदणीचा क्रमांक भरणं लिहिणं सक्तीचं केलं आहे.

सोबतच शाळेत नोंदणीकृत असलेलं नाव आणि आधार कार्डावरील नाव एकसमान, एकाच क्रमात म्हणजे (आडनाव, स्वत:च नाव आणि वडिलांचं नाव) असलं पाहिजे, असंही बंधनकारक करण्यात आलं आहे. तसं नसल्यास ‘सीबीएसई’कडून भलेही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास अडवण्यात येणार नाही. पण काॅलेजात प्रवेश घेताना अडचण येऊ नये म्हणून ‘सीबीएसई’ने ही सक्ती केल्याचं स्पष्ट केलं आहे.


नावातील दुरूस्तीसाठी ‘हे’ करा

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Banks/Post Offices Enrolment Center Search वर क्लिक करा किंवा UIDAI च्या https://appointments.uidai.gov.in/EAsearch.aspx या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर स्टेट, पिनकोड आणि सर्चबॅक्सचा पर्याय उपलब्ध होईल.
  • यापैकी स्टेट पर्याय निवडल्यास स्टेट, डिस्ट्रीक्ट, सब डिस्ट्रीक्ट, व्हिलेज टाऊन सिटी चे रकाने भरा आणि व्हेरीफिकेशन कोड टाकून सर्च बटन दाबा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागातील कुठल्या बँक आणि पोस्ट आफिसमध्ये आधार केंद्र आहे, याची संपूर्ण माहिती पत्ता आणि कोणत्या व्यक्तीशी संपर्क साधायचा यासकट मिळेल.
  • पिनकोड पर्याय निवडल्यास तुमच्या घराच्या जवळ कुठली बँक आणि पोस्ट आफिसमध्ये आधार केंद्र आहे, त्याचा तपशील मिळेल.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा