पॅनकार्ड 'आधार'ला लिंक करा, नाहीतर होईल बंद, एप्रिलपासून नियमांत होणार बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सध्या पॅनकार्ड अनेक ठिकाणी अनिवार्य करण्यात आलं आहे. परंतु पॅनकार्ड तयार करण्यापूर्वी आता काही नव्या बाबी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्राप्तिकर विभागाने एक अधिसूचनादेखील काढली आहे. १ एप्रिलपासून हे नवे नियम लागू होणार असून जाणून घेऊया काय आहेत हे बदल.

आधार पॅन जोडणं अनिवार्य

पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडणं आता अनिवार्य करण्यात आलंय. जर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल, तर ते पॅन कार्ड निष्क्रिय समजलं जाणार आहे. यापूर्वी आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ३१ तारखेपर्यंत आधार पॅनला लिंक करणं आवश्यक आहे. तसंच २.५ लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असल्यास पॅनकार्ड काढणं अनिवार्य आहे.

क्यूआर कोडही असणार

पॅनकार्डवर नाव, जन्म तारीख अशा माहितीशिवाय आता क्यू-आर कोडही देण्यात येणार आहे. यामध्ये अर्जदाराच्या फोटोसहित त्याची स्वाक्षरी आणि अन्य माहितीही उपलब्ध असेल. पॅन कार्ड स्कॅन करून ही माहिती पाहता येणार आहे. तसंच यासाठी वापरण्यात येणारी जागाही बदलण्यात येणार असून ई-पॅनमध्येही हा क्यू-आर कोड देण्यात येणार आहे.

मोबाईलवरून होणार स्कॅन

पॅन कार्डवर देण्यात येणारा क्यू-आर कोड हा मोबाईलवरून काही अॅपद्वारे स्कॅन करता येणार आहे. यासाठी ‘एनहॅन्स्ड पॅन क्यूआर कोड रिडर’ असं गुगल प्ले स्टोअरवरअॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. तसंच नवं पॅनकार्ड आलं तरी जुनं पॅन कार्डही सक्रीय राहणार आहे. यासंदराभात अधिक माहिती https://www.tin-nsdl.com/  या वेबसाइटवर पाहता येणार आहे.


हेही वाचा -

'मनसेनं लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावं', विनोद तावडेंचं राज ठाकरेंना आव्हान

पगार वेळेत मिळत नसल्याने हैराण, बेस्ट कामगार साधणार मुंबईकरांशी संवाद


पुढील बातमी
इतर बातम्या