Advertisement

'मनसेनं लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावं', विनोद तावडेंचं राज ठाकरेंना आव्हान

'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवावी आणि डिपॉझिट वाचूवन दाखवावं’, असं आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना दिलं.

'मनसेनं लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावं', विनोद तावडेंचं राज ठाकरेंना आव्हान
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी वाद्रे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवावी आणि डिपॉझिट वाचूवन दाखवावं’, असं आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना दिलं.


विनोद तावडे यांचे पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर विनोद तावडे यांनी राज यांच्यावर पलटवार केला. रंगशारदामध्ये जेथे अनेक नाटकं होतात. त्यात अजून एक नाटक पहायला मिळालं. परवा मुख्यमंत्री म्हणाले बारामतीचा पोपट! त्याला अधोरेखित करणारं आजचं भाषण होतं. मला आता मनसेला म्हणायचं आहे की, ''तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझीट वाचवून दाखवा.''

''सध्या मला आश्चर्य वाटतं की, राज ठाकरे हे अतिशय सुज्ञ नेते आहेत. तरीसुध्दा आपल्या सैन्यांनी जी कामगिरी केली, त्यावर अशा पध्दतीने बोलणं हा सैन्यांचा अपमान आहे. खऱ्या अर्थानं पाकिस्तानचे ते हिरो होऊ इच्छितात का? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे,'' असंही तावडे म्हणाले. तसंच, पोपटाचा रंग हिरवा असतो, तो पाकिस्तानचा तर नाही ना असं मला वाटते, असा उपरोधिक टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा