शहरात सायकल चालवण्यास प्रोत्साहन देणारा प्रकल्प- आदित्य ठाकरे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पश्चिम द्रुतगती महामार्गावर होऊ घातलेला सायकल ट्रॅक प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सायकल वापरास चालना मिळण्यासोबतच हा प्रकल्प पर्यावरणपूरक असेल, असं मुंबई (mumbai suburban) उपनगराचे पालकमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.  

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो लाईन ३ च्या संदर्भाने पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित सायकल ट्रॅक आणि मिठी नदी किनारा सुशोभीकरण याबाबतही सादरीकरण करण्यात आलं आणि आढावा घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह महापालिकेचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

हेही वाचा- आदेश निघाले.., खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

मेट्रोच्या विशेषत: पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसंच टनेलिंगची कामे, पूर नियंत्रण, पंपिंग स्टेशन आदी बाबींचा यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी आढावा घेतला. 

यानंतर झालेल्या बैठकीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर करावयाच्या सायकल ट्रॅकचा आढावा घेण्यात आला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरात सायकल वापरास चालना देण्यास पर्यावरणपूरक आणि सहाय्यभूत ठरेल, असं पालकमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मिठी नदीची स्वच्छता आणि नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण याबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली. मुंबई शहरातून वाहणारी ही नदी  प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच तिचं सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हेही वाचा- विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा, उद्धव ठाकरेंची पोलिसांना सूचना
पुढील बातमी
इतर बातम्या