Advertisement

विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा, उद्धव ठाकरेंची पोलिसांना सूचना

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियमांचं उल्लंघन करणारे तसंच विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा, उद्धव ठाकरेंची पोलिसांना सूचना
SHARES

कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियमांचं उल्लंघन करणारे तसंच विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली. नाशिकच्या ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात कोरोनाविषयक आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्यावेळेपेक्षा यावेळचं कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहयोग देणं गरजेचं आहे. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर तसंच विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली.

हेही वाचा- महाराष्ट्रात कोविड लसीचे दररोज ३ लाख डोस द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी. नागरिकांचा सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहून याबाबत पुढील निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

कोविडचं लसीकरण करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मनपा आयुक्तांना दिले.

ल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेशन बेड, रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी सर्व यंत्रणा मिळून करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सादरीकरणाद्वारे सांगितलं.

तसंच मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबीमधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

(maharashtra cm uddhav thackeray gave instruction to police department to take a strict action against without mask people)

हेही वाचा- आदेश निघाले.., खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा