Advertisement

महाराष्ट्रात कोविड लसीचे दररोज ३ लाख डोस द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दर दिवशी ३ लाख लस देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिले.

महाराष्ट्रात कोविड लसीचे दररोज ३ लाख डोस द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
SHARES

कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थान नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब समाधानकारक असली, तरी लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दर दिवशी ३ लाख लस देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिले.

मुख्यमंत्री विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे लसीकरण संदर्भात बैठकीत बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope), मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोविड लसीकरणात (coronavirus vaccination) १८ मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वलस्थानी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आत्तापर्यंत दोन्ही मिळून ३६ लाख ३ हजार ४२४ डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान ३६ लाख ८४ हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढं आहे, असं दैनंदिन लसीकरण अहवालावरून दिसतं.

हेही वाचा- १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

केंद्रीय आरोग्य सचिवांनी बुधवारी पंतप्रधानांसमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत महाराष्ट्रातील लसीकरण प्रमाण चांगलं आहे, असं सांगितले होतं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी असं असलं तरी दिवसाला ३ लाख डोस देऊन लसीकरण  वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी देखील लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा मिळावा, अशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

महाराष्ट्राने (maharashtra) ३१ लाख ५ हजार १६९ पहिला डोस आणि ४ लाख ९८ हजार २५५ दुसरा डोस असं लसीकरण केलं आहे. तर राजस्थानने ३० लाख ९२ हजार ६३५ पहिले डोस व ५ लाख ९२ हजार २०८ दुसरे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेशने एकूण दोन्ही मिळून ३२ लाख ४६ हजार ३२३, पश्चिम बंगालने ३० लाख १७ हजार ३५, गुजरातने २८ लाख ५३ हजार ९५८ असे दोन्ही मिळून डोस दिले आहेत. 

त्यानंतरची इतर काही राज्ये पुढीलप्रमाणे आहेत : कर्नाटक १९ लाख २७ हजार २४६, केरळ १८ लाख ९१ हजार ४३१, तामिळनाडू १७ लाख १८ हजार ३१३, मध्यप्रदेश १८ लाख ६६ हजार १३८, बिहार १६ लाख ३४ हजार ६५, आंध्र प्रदेश १३ लाख १६ हजार १९२, दिल्ली ८ लाख ६७ हजार ४३३

महाराष्ट्रात इतर काही राज्यांच्या तुलनेत लस विविध कारणामुळे वाया जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. काही राज्यांत २० टक्क्यांपर्यंत लस वाया जाते. मात्र महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ ६ टक्के आहे, ते देखील शून्यावर आलं पाहिजे. केंद्र सरकारने दिलेल्या नियमांप्रमाणेच लसीकरण झालं पाहिजे, असे निर्देश देखील उद्धव ठाकरे यांनी दिले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा